Ad will apear here
Next
ठाणे कलाभवनमध्ये २४ नोव्हेंबरपर्यंत राष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन


ठाणे :
ठाणे महानगरपालिका आणि फोटो सर्कल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आविष्कार २०१९’ ही राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा नुकतीच घेण्यात आली होती. या स्पर्धेचेहे २१वे वर्ष असून, या स्पर्धेत १९ राज्यांतून सहा हजार ३२५ छायाचित्रांसह ६७३ छायाचित्रकारांनी सहभाग घेतला होता. या छायाचित्रांचे प्रदर्शन २२ नोव्हेंबर २०१९ पासून कापूरबावडीतील ठाणे कलाभवनात सुरू झाले आहे. २४ नोव्हेंबरपर्यंत ते सुरू राहणार आहे.



या स्पर्धेतील राष्ट्रीय विजेते असे –

मोनोक्रोम विभागात अभिषेकबसक, राणा मुखर्जी (पश्चिम बंगाल), मोहंमद असिफ, कार्मिक एम. डी. (कर्नाटक) हे विजेते ठरले आहेत. खुल्या गटात मोहंमद असिफ (कर्नाटक), हिरा पंजाबी, प्रथमेश दीक्षित (महाराष्ट्र), अबीर घोष, सरोज मलिक (पश्चिम बंगाल) हे विजेते ठरले आहेत. ‘नेचर-वाइल्ड लाइफ’ या गटात भास्कर आठवले, प्रमोद बनसोडे (महाराष्ट्र), प्रमोद शानभाग, प्रवीण सिद्धनवार (कर्नाटक), कल्लोल मुखर्जी (पश्चिम बंगाल) हे विजेते ठरले आहेत. ‘ट्रॅव्हल’ या विषयावरील स्पर्धेत अमित राणे, सुधीर नाझरे, अंकुर तांबडे (महाराष्ट्र), अविक शाह, कृष्णा भट हे विजेते ठरले. ‘स्टेट फोटोग्राफी’ या विषयावर आधारित स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील के. के. चौधरी, संदीप यादव, सुजित म्हात्रे, गजानन दुधलकर, महेश आंब्रे हे स्पर्धक विजयी ठरले आहेत.

हे छायाचित्र प्रदर्शन जरूर पाहावे, असे आवाहन ठाणे महानगरपालिका आणि फोटो सर्कल सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZSSCG
Similar Posts
कलाकार घडण्यासाठी हवा प्रत्यक्ष अनुभवच; तंत्रज्ञानाचा वापर कलात्मकता मारण्यासाठी नको पुणे : ‘हल्ली इंटरनेटवर कोणता विषय मिळत नाही असे नाही. त्यामुळे मुलांना एखादा विषय सांगितला की पालक लगेच मोबाइल, इंटरनेट वापरतात; मात्र कोणताही कलाकार घडायचा, घडवायचा असेल, तर मुलांना प्रत्यक्ष अनुभवच देणे आवश्यक असते. स्वतःच्या कल्पकतेने, सर्जनशीलतेतून आणि निरागसतेतून साकारलेली कलाच दीर्घ काळ टिकाव धरू शकते
६७वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव - चौथ्या दिवसाचे व्हिडिओ पुण्यात सध्या सुरू असलेल्या ६७व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात चौथ्या दिवशी (१४ डिसेंबर २०१९) किराणा घराण्याचे गायक ओंकारनाथ हवालदार यांनी कन्नड-मराठी अभंग सादर करून रसिकांची मने जिंकली. शाकिर खान (सतार), तेजस उपाध्ये (व्हायोलिन) यांचे सहवादन, स्वामी कृपाकरानंद, तसेच अश्विनी भिडे-देशपांडे यांचे गायन, डॉ
शिवाजी विद्यापीठातर्फे परिसर छायाचित्रण स्पर्धा; ५० हजारांची पारितोषिके कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातर्फे शिवाजी विद्यापीठ परिसर छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेतील विजेत्यांना सुमारे ५० हजार रुपयांची पारितोषिके व प्रशस्तिपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. या स्पर्धेत छायाचित्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी केले आहे
‘भैरव भवतारक’ नृत्याविष्काराद्वारे नवरसांची अनुभूती पुणे : भक्ती, शक्ती, करुणा, शृंगार, क्रोध अशा विविध भावनांचा मिलाफ असलेल्या ‘भैरव भवतारक’ या अनोख्या नृत्याविष्काराने पुणेकर रसिकांना नवरसांची अनुभूती दिली. महाशिवरात्रीच्या निमित्ताने ‘ऋत्विक फाऊंडेशन’ व ‘ऋजुता सोमण कल्चरल अकॅडमी’च्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रसिद्ध कथक नृत्यांगना

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language